News34 chandrapur
चंद्रपूर - राज्यातील राजकारणात खळबळ उडविणारी बातमी म्हणजे शिवसेनेचे निवडणूक निशाणी धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठविल्याची. Political update
Election symbol mashal
Election symbol mashal
त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गट असे नाव दोन्ही नेत्यांना दिले.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह मिळाले. Shivsena-thackeray group
निवडणूक चिन्ह मिळाल्यावर चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाने जल्लोष करीत, मशाली पेटविल्या.
यावेळी चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की, शिवसेनेला मिळालेली मशाल ही बाळासाहेबांच्या विचारांची क्रांती आहे, आम्ही या निवडणूक चिन्हाला सामान्य माणसांच्या दारात पोहचवू. Shivsena news
शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्याना अंधेरी पूर्व निवडणुकीत जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, पोट निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार मताधिक्याने निवडून येणार.
यावेळी विक्रांत सहारे, सूचित पिंपळशेंडे, मनस्वी गिर्हे व महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
