News34 chandrapur
कोरपना - तालुक्यात अनेक सिमेंट कंपन्या असून यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात सुरू आहे, नागरिक आधीच प्रदूषणाने त्रस्त आहे मात्र आता वायू प्रदूषण व फटाक्यांच्या प्रदूषणाने रुग्णांना समस्येचा सामना करावा लागला.
कोरपना येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात 24 ऑक्टोम्बरला दिवाळीच्या दिवशी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, फटाक्यातून निघालेला धूर सरळ रुग्णालयात शिरला, त्या धुरीचा रुग्णांना नाहक त्रास झाला. Diwali 2022
हा सर्व प्रकार रुग्णालयातील डॉ. आकाश जीवने यांच्यासमोर सुरू होता, याबाबत डॉ.जीवने यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सरळ सांगितले दिवाळीचा दिवस आहे, तर आम्ही फटाके फोडायचे कुठे? आमचं निवासस्थान व रुग्णालय आमोरा समोर असल्याने आम्ही रुग्णालय परिसरातचं फटाके फोडले.
अधिक माहितीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सरळ ही गंभीर बाब असून याबाबत चौकशी करू दोषी आढळल्यास कारवाई सुद्धा करणार अशी माहिती दिली.
रुग्णालय परिसरात फटाक्यांची आतिषबाजीचा व्हिडीओ रुग्णालयातील रुग्णाने स्वतः बनविला, सध्या तो व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. Virul video
रुग्णालय परिसर हे शांतता झोन च्या आत येते मात्र त्या परिसरात फटाक्यांचा आवाज आणि धूर यामुळे रात्रभर रुग्ण चांगलेच त्रस्त झाले होते.
याबाबत रुग्णालय प्रमुख डॉ. गायकवाड यांच्याशी सुद्धा सम्पर्क साधण्यात आला मात्र ते सुट्टीवर गेले असल्याची माहिती मिळाली.