News34 chandrapur
भद्रावती - तुकारामच्या मुलाची तब्बेत बरी नव्हती, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी तुकाराम यांनी घनश्याम ला दुचाकी वाहन मागितले, मात्र घनश्याम ने दुचाकी देण्यास असमर्थता दाखविल्याने रागाच्या भरात तुकाराम ने धारधार शस्त्राने वार करीत घनश्याम ची हत्या केली.
एक क्षुल्लक कारण हत्येला कारणीभूत ठरले, सदर घटना भद्रावती तालुक्यातील कोंडेगाव येथे घडली.
मुलाची तब्येत बरी नव्हती त्याला दवाखान्यात नेण्यासाठी तुकाराम ने घनश्याम यांना दुचाकी वाहन मागितले, मात्र घनश्याम यांनी दुचाकी दिली नाही. Chandrapur crime
दुचाकी न दिल्याने तुकाराम व घनश्याम यांचा वाद झाला, वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात तुकाराम यांनी घरी जाऊन धारधार शस्त्र आणत घनश्याम यांचेवर वार केले. Sp chandrapur
सदर वाद सोडविण्यासाठी घनश्याम यांचा मुलगा 24 वर्षीय शक्ती सहारे मध्ये पडला मात्र त्याच्यावर सुद्धा तुकाराम ने वार केले, या हल्ल्यात शक्ती गतर जखमी झाला असून त्याच्यावर नागपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. क्षुल्लक वादात 55 वर्षीय तुकाराम भोयर यांनी शेजारी राहणाऱ्या 55 वर्षीय घनश्याम भोयर यांची हत्या केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
आरोपी 55 वर्षीय तुकाराम नारायण भोयर यांना भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी व उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी घटनास्थळी दाखल झाले होते. Murder in chandrapur
पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.