News34 chandrapur
चंद्रपूर - रस्त्याचं काम झाल्यावर कामाचे पैसे काढून देण्यासाठी वेकोली वणी क्षेत्राचे 58 वर्षीय गणेश वाघमारे अभियंता, निलजई उपक्षेत्र यांनी कंत्राटदाराला 10 हजार रुपयांची लाच मागितली, मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने याबाबत CBI च्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. Bribe
7 ऑक्टोम्बरला CBI च्या चमूने निलजई क्षेत्रात धाड मारीत वाघमारे यांना लाचेची रक्कम घेत असताना रंगेहात अटक केली. Cbi raid
कंत्राटदाराने वेकोली अंतर्गत रस्त्यांचे काम केले होते, त्या कामाचे 2 बिल 1 लाख 98 हजार, 1 लाख 98 हजार बाकी होते, सदर बिलातील रक्कमेचा धनादेश देण्यासाठी वेकोली अभियंता वाघमारे यांनी 10 हजार रुपये कंत्राटदाराला मागितले होते.
सदर लाचेच्या रकमेत अजून कुणाचा वाटा होता काय? याबाबत सध्या तपास सुरू आहे.
कंत्राटदाराने याबाबत CBI ला तक्रार देत, वेकोली अभियंत्याला रंगेहात अटक CBI च्या जाळ्यात अडकविले.
CBI ने निलजई च्या कार्यालयात धाड मारली, त्यांनतर पुढची चौकशी वेकोली विश्रामगृहात सुरू केली. Western coalfields limited
विशेष म्हणजे वेकोली हे गलेलठ्ठ पगार असणारे कर्मचारी अधिकारी यांचं केंद्र आहे, तरीसुद्धा 10 हजारासाठी कंत्राटदाराला त्रास देणे योग्य आहे काय? असा प्रश्न कारवाई दरम्यान उपस्थित झाला.
सदरची कारवाई CBI लाचलुचपत विभागाचे DIG खान यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP संदीप चौगुले, नीरज गुप्ता, विजय कुमार, JK मोहन व कर्मचाऱ्यांनी केली.
