News34 chandrapur
चंद्रपूर - पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा भारतीय जनता ओबीसी मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात व युवा नेते वामन तुराणकर यांच्या नेतृत्वात राजुरा तालुक्यातील भेंडवी व येरगव्हाण येथील पूर्वाश्रमीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. Youth join bjp
उमेश मडावी, सुनील आत्राम, प्रशांत वंडगुलवार, राजू उडतोलू, रमेश मडावी, बालाजी दुर्गे, अनुप करमनकर यांच्यासह अनेक युवकांचा हंसराज अहीर यांनी पक्षाचा दुपट्टा घालुन सन्मान केला. Political news आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला विजयी करण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनात कार्य करावे अशी सूचना करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, विनोद शेरकी, प्रशांत डाखरे उपस्थित होते. Chandrapur bjp