News34 chandrapur
चंद्रपूर - 2 ऑक्टोम्बरला सकाळी चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या चिंचाला गावात भीषण अपघात घडला. सकाळी 9 वाजता सिदूर येथे राहणारे 3 युवक 18 वर्षीय अंकित मत्ते, 24 वर्षीय संकेत झाडे व अजय माथूलकर हे दुचाकीने बाहेर फिरायला निघाले होते. चिंचाला गावाजवळ पोहचताच DNR ट्रान्सपोर्ट च्या कॅप्सूल ट्रक ने दुचाकीला जोरदार धडक दिली. Terrible accident chandrapur
या धडकेत संकेत झाडे हा जागीच ठार झाला तर अंकित मत्ते रुग्णालयात दगावला, अजय माथूलकर गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले. त्यानंतर भाजप चे पदाधिकारी व आता शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे चिंचाला गावात दाखल झाले असून गावकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, मृतक युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकरी करीत आहे. पडोली पोलीस चिंचाला गावात दाखल झाली आहे. मागील 5 तासापासून चक्काजाम आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच रांगा लागल्या आहे.