News34 chandrapur
चंद्रपूर - देशात 70 वर्षे कांग्रेसने राज्य केल्यावर आज ते सत्तेच्या बाहेर झाले आहे.
याचं कारण पक्षात निर्माण झालेली गटबाजी, जेष्ठ असो की नवीन नेते कांग्रेसमध्ये गटबाजीची परंपरा आजही कायम आहे. Congress news
गटबाजीची अशीच परंपरा चंद्रपूर जिल्ह्यातही कायम आहे.
कांग्रेसमधील पक्षांतर्गत वाद हा पक्षात राहत नसून बाहेर पडतो त्यामुळे कांग्रेस पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आजही गटबाजीचे निखारे तपत आहे, गटबाजीची ही आग महिला कांग्रेसमध्ये सुद्धा लागली आहे.
मात्र कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या निर्णयाने ही गटबाजी थांबणार काय? असे चित्र सध्या निर्माण होताना दिसत आहे. Bharat jodi yatra
आज कांग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी देशासाठी संघर्ष करताना दिसत आहे, गांधींचा संघर्ष बघत रामू तिवारी यांनी मनपा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, आपण पक्ष वाढवू, सध्या कांग्रेस पक्षात जी गटबाजी आहे, त्याला आता थांबविण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिली आहे. Congress factionalism
तिवारी यांनी कांग्रेसचे जेष्ठ नेते नरेश बाबूजी पुगलिया, विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्यातील वाद संपुष्टात यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
मागील 2 दिवसापासून रामू तिवारी यांच्या बॅनर ची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
ईद निमित्त शहरात लावलेल्या फलकावर माजी खासदार नरेश पुगलिया, खासदार धानोरकर व विजय वडेट्टीवार यांचे एकत्र फोटो लावल्याने, पुन्हा कांग्रेसचे दिगग्ज नेते एकत्र येणार की काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये जोर पकडत आहे.
रामू तिवारी यांनी कांग्रेसच्या दिग्गज नेत्यांना एकत्र आणल्यास जिल्ह्यात कांग्रेसला नवसंजीवनी मिळेल व येणाऱ्या निवडणुकीत कांग्रेस पक्षाला हरविणे भाजपला सुद्धा कठीण जाणार.
काही ही असो पण महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी पक्षातील गटबाजी संपुष्टात यावी यासाठी पहिले पाऊल पुढे टाकले आहे, आता तिवारी यांच्या प्रयत्नाला दिग्गज नेते थारा देणार की फेटाळणार ही तर येणारी वेळच सांगेल.


