News34 chandrapur
चंद्रपूर / जिवती - ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर जवळ असणारी DP उघडी असते, यामुळे अनेक दुर्घटना सुद्धा घडल्या आहे, मात्र वीज वितरण कंपनीने यावर अजूनही संज्ञान घेतलेले नाही. Tragic incident
अशीच वीज वितरण कम्पणीच्या निष्काळजीपणा जिवती तालुक्यात उघडकीस आला आहे, शनिवारी सकाळी 10 वाजता लांबोरी गावात राहणाऱ्या मडावी कुटुंबातील 4 वर्षीय ललिता भीमराव मडावी अंगणात खेळत होती.
खेळता- खेळता ललिता अचानक वीज खांबाजवळ गेली, त्याठिकाणी DP उघडी होती, अचानक ललिता चा DP ला हात लागला, ललिता विजेच्या संपर्कात आली. Electric shock
ललिता ला विजेचा जबर धक्का बसला, त्यात ती जागीच मृत पावली. कुटुंबाने ललिता ला वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र तिचा जागीच मृत्यू झाल्याने सर्व प्रयत्न अयशस्वी राहिले.
अवघ्या 4 वर्षात ललिता अचानकपणे जग सोडून निघून गेली, या दुःखद घटनेमुळे मडावी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
