News34 chandrapur
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्याची रहिवासी असलेले संजय कन्नावार यांची रा.स.प. च्या विदर्भ महासचिव पदी नुकतीच दूसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या नियुक्तीमुळे राष्ट्रीय समाज पक्षाला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव केला. Rashtriya samaj party
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संजय कन्नावार हे पत्रकार असून साप्ताहिक चंद्रपूर क्रांती नावाचे वृत्तपत्र प्रकाशित करीत असून त्या माध्यमातून व पक्षाच्या माध्यमातून नेहमी जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडीत असतात. त्यांच्या याच समाज कार्याला बघून त्यांचेवर पक्ष नेतृत्वाने दुसऱ्यांदा त्यांच्यावर विदर्भ महासचिव ही जबाबदारी दिली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा.ॲड.रमेश पिसे, संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कन्नावार यांची निवड करण्यात आली.यावेळी त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या म्हाळगी नगर येथील विदर्भ कार्यालयात विदर्भ स्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून अनेक पदावर नियुक्त्याही करण्यात आले.या विदर्भ स्तरीस आढावा बैठकीस अध्यक्ष म्हणून हरीकिशन हटवार हे होते.यावेळी विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा.ॲड.रमेश पिसे,विधी आघाडीचे विदर्भ अध्यक्ष ॲड वसुदेव वासे, रामदास माहुरे, पुरूषोत्तम कामडी,उत्तम चव्हाण, देविदास आगरकर, नंदकिशोर काळे,दत्ता मेश्राम, विलास कळबे, संध्याताई शेठे,रिमाताई चव्हाण आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षण जागर यात्रा काढण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष ॲड रमेश पिसे यांनी केले आहे.संजय कन्नावार यांच्या नियुक्तीने पक्ष वाढीचे काम जोमाने सुरू होईल अशी आशा व्यक्त करीत अभिनंदनही केले.