News34 chandrapur
नागपूर - आज (दि. ३०) ऑक्टोम्बरला ला स्थानिक रेजंटा सेंट्रल हॉटेल अँड कन्व्हेशंन सेंटर येथे विदर्भ सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात विदर्भातील विविध क्षेत्रातील कार्यरत सक्रीय अग्रणींचा सन्मान करण्यात आला.
यात विदर्भातील ओबीसी व विदर्भ विकास चळवळीतील नेते, शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील अग्रणी डॉ. अशोक जीवतोडे यांचा त्यांच्या सामाजिक कार्यासाठी अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे actor sayaji shinde यांच्या हस्ते विदर्भ सन्मान पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
सोहळ्यात गडचिरोलीचे पोलीस उपमहानिदेशक संदीप पाटील यांचेसह विविध शासकीय विभागातील मुख्य अधिकारी व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.