ट्वीट एडिट करण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ
ट्विटरने गेल्या महिन्यात सांगितले होते की, एडिट फिचर लाँच करण्यात येणार असून सध्या हे फिचर फक्त निवडक युजर्ससाठी उपलब्ध असेल. या फिचरमध्ये तुम्हाला तुमचं ट्वीट दुरुस्त करण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ मिळेल. यूजर्सकडून एडिट फीचरची सर्वाधिक मागणी करण्यात आली होती. यामुळे युजर्सना टायपिंग चूक दुरुस्त करण्याची किंवा ट्वीटमधील हॅशटॅग बदलण्याची संधी मिळेल.
सध्या एडिट फिचर फक्त निवडक युजर्ससाठी
ट्वीट एडिटचं नवीन फिचर सध्या फक्त आयफोन युजर्ससाठी ( Ios Users) लाँच करण्यात आलं आहे. भारतातही व्हेरिफाईड युजर्सना ( Verified Users ) ट्विटरचं एडिट फिचर वापरता येणार आहे. एडिट केलेल्या ट्विटवर युजर्सना ट्वीट एडिट केलेली वेळही दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ट्वीट एडिट केलेला इतिहास तपासू शकता. सध्या हे फीचर निवडक युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. लवकरच एडिट फिटर सर्व युजर्ससाठी लाँच करण्यात येईल.