News34 chandrapur
चंद्रपूर - 20 ऑक्टोम्बरला महाराष्ट्र शासन गृह विभागाने तब्बल 24 IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे.
यामध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी मुंबई येथे कार्यरत रवींद्रसिंह परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. SP Chandrapur
बदली आदेशात सध्यातरी विद्यमान पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना पदस्थापना दिली नाही. IPS Transfer maharashtra साळवे यांच्या पद स्थापणेचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.
रवींद्रसिंह परदेशी हे काही वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात SDPO म्हणून रुजू झाले होते.
मागील 2 वर्षात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्याचा उलगडा, गंभीर गुन्ह्यातील आरोपीना पकडण्यास यश मिळाले होते. New Superintendent of police
एकूणच पोलीस अधीक्षक साळवे यांचा कार्यकाळ समाधानकारक होता.