News34 chandrapur
चंद्रपूर - राज्याच्या राजकारणात शिवसेना पक्षात झालेल्या बंडाने खळबळ माजवून दिली होती, मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर प्रेम करणार्याची संख्या वाढत गेली. Political breaking
एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्याच्या राजकारणात नवा अध्याय ठेवण्याच्या तयारीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा महिला संघटिका उज्वला नलगे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात शिवसेनेची चांगलीच बदनामी झाली.
कोळसा व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणी नलगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांनी कोर्टातून जामीन मिळविला मात्र पक्षविरोधी कामे केल्याने शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. Coal depo Extortion
शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून शिवसेना जिल्हा महिला संघटिका उज्वला नलगे यांची हकालपट्टी केल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले.
याबाबत उज्वला नलगे यांनी 20 ऑक्टोम्बरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्ष पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करीत, कोळसा व्यावसायिकांकडून 15 लाख रुपये घेतल्याचा आरोप लावला होता.
आम्ही पैसे घेणारे नाही हे लवकर सिद्ध करून दाखविणार व कोलडेपो विरोधात उपोषण करणार अशी नलगे यांनी घोषणा केली, मात्र ते उपोषण मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून करणार असे त्यांनी सांगितले. shivsena chandrapur
एकंदरीत नलगे यांना खंडणी प्रकरण चांगलेच भोवले, राज्याच्या राजकारणात शिवसेनेची वाढती लोकप्रियता झाली मात्र दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेची खंडणी कारक प्रतिमा या प्रकरणानंतर झाली होती.
जानेवारी महिन्यात शिवसेनेने कोलडेपो विरोधात आंदोलन पुकारले होते मात्र पुढील कारवाई महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे गेल्याने त्यावर काय कारवाई झाली हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे.