News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरात 20 ऑक्टोम्बरला सकाळी 10 वाजता फोनवर बोलत असताना अज्ञात दोघांनी मोबाईल हिसकावला. Chandrapur crime news
20 ऑक्टोम्बरला श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय जवळ सकाळी 60 वर्षीय उदय प्रभाकर बेजगमवार हे सकाळी मोबाईल वर बोलत होते.
अचानक त्यावेळी दुचाकीवर दोघांनी बेजगमवार यांचा मोबाईल हिसकावला व तिथून पळून गेले.
याबाबत बेजगमवार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. Sp chandrapur
शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला, घटनेच्याया अवघ्या काही तासातच गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल व कर्मचारी यांनी तात्काळ दोन आरोपींना अटक केली.
आरोपीमध्ये 23 वर्षीय विकास भीमराव गवई व 19 वर्षीय साहिल सतीश लामदूरवार राहणार भिवापूर वार्ड यांचा समावेश होता. Grabbed the mobile phone
सदर गुन्ह्यातील मोबाईल samsung Galaxy M31 किंमत 15 हजार व गुन्ह्यात वापरलेली bullet वाहन MH34BX4353 जप्त करण्यात आले.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जयप्रकाश निर्मल, शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता जुनारकर, सचिन बोरकर, चेतन गजलवार, दिलीप कुसराम, इम्रान खान, रुपेश रणदिवे, इर्शाद खान यांनी 24 तासाच्या आत केली.