News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील बालाजी वार्डातील दत्त मंदिरात 21 ऑक्टोम्बरला चांदीचा मुकुट, पादुका व दानपेटीत असलेली रोख रक्कम असा एकूण 11 हजार रुपयांचा माल अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. Chandrapur crime
या प्रकरणाची तक्रार फिर्यादी बालाजी वार्डातील आशिष पांडे यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला दिली होती. Theft in the temple
ऐन सणासुदीच्या काळात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले होते, मात्र चोर घराऐवजी धार्मिक स्थळांना लक्ष्य करीत आहे. Sp chandrapur
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल व पोलीस कर्मचारी सचिन बोरकर यांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत काही तासातचं आरोपीला अटक केली.
आरोपी 21 वर्षीय महावीर नगर निवासी दीपक सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दत्त मंदिर मधून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वात शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता जुनारकर, दिलीप कुसराम व इम्रान खान यांनी केली.