News34 chandrapur
बल्लारपूर - नवरात्रोत्सव मध्ये विवेकानंद नगरातील शारदा देवी मंडळाकडे महाप्रसाद घेण्याकरिता गेलेल्या 54 वर्षीय रूपाताई लखन कुशवाह या परत आल्याचं नाही. Missing case
याबाबत कुटुंबीयांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली मात्र घटनेला 15 दिवस लोटल्याने रुपाताई यांचा थांगपत्ता लागला नाही.
नवरात्र च्या काळात 4 ऑक्टोबर ला विवेकानंद नगरातील शारदादेवी मंडळात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रुपा कुशवाह या गेल्या होत्या, मात्र त्या परत आल्या नाही, याबाबत लखन कुशवाह यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये 7 ऑक्टोम्बरला तक्रार नोंदविली. Ballarpur crime
सध्या घातपाताचे प्रकार जिल्ह्यात वाढत आहे, अनेक मुली व महिलांना भूलथापा देत पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहे.
कुशवाह कुटुंबीयांनी अनुचित घटना तर घडली नसावी असा संशय व्यक्त केला आहे, याबाबत राज्याचे मंत्री मुनगंटीवार व RPI चे जयप्रकाश कांबळे यांना निवेदन देत रुपा कुशवाह यांना शोधण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.