News34 chandrapur
नागपूर - आज देशात तरुणाईला onlilne game खेळण्याचा नाद लागला आहे, आता हा छंद महिलांनाही लागला आहे.
Online game खेळण्याच्या नादात नागपुरातील एक महिला कर्जबाजारी झाली, आश्चर्य म्हणजे कर्जबाजारी झालेल्या महिलेला नातेवाईकांनी 15 लाख रुपयांचा चुना लावला, याप्रकरणी महिलेने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणूक करणारे नातेवाईक बंटी-बबली यांना अटक केली आहे. Playing online game
अमित तिवारी आणि रेणुका तिवारी अशी अटक करण्यात आलेल्या बंटी बबलीची नावे आहेत.
नागपुरातील एका महिलेला ऑनलाईन गेम खेळण्याचा नाद लागला होता. गेमच्या वेडापायी ती कर्जबाजारी झाली होती. याबाबत तिने आपले नातेवाईक असलेले अमित तिवारी आणि रेणुका तिवारी यांना विश्वासाने याबाबत सांगितले. मात्र तिवारी दाम्पत्याने महिलेला मदत करण्याऐवजी तिचा गैरफायदा घेतला. 15 lakh fraud
महिलेने कर्ज फेडण्यासाठी एका नातेवाईकाकडून एक लाख रुपये उधार घेतले होते. मात्र नातेवाईकांनी पैसे परत मागितल्यानंतर तिने नातेवाईक असलेल्या तिवारी दाम्पत्याकडे पैसे मागितले. Nagpur crime news
तिवारी दाम्पत्याने तिला पैसे देतो सांगत सासऱ्याच्या इन्शुरन्सचे पैसे आल्यावर पैसे परत देणार असं स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले. त्यावर धोक्याने तिची सही घेत तिला ब्लॅकमेल करायला सुरवात केली. महिलेकडून एका महिन्यात 15 लाख रुपये उकळले. Women in debt
मात्र तिवारी दाम्पत्याची मागणी वाढत चालल्याने महिलेने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरच्यांनी जरीपटका पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत खंडणी प्रकरणात तिवारी दाम्पत्याला अटक केली आहे.