News34 chandrapur
चंद्रपूर - : चंद्रपुरात पहिल्यांदाच श्री गोवर्धनमठपुरी पीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलाचंद सरस्वतीजी महाराज यांचे आगमन होत असून, त्यांच्या उपस्थितीत १८ ऑक्टोबर रोजी दिव्य धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रोत्कर्ष अभियान श्री शंकराचार्य स्वागत समितीच्या वतीने भागवताचार्य मनीष महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Shankaracharya Swami Nishchalachand Saraswati Maharaj
Shankaracharya Swami Nishchalachand Saraswati Maharaj
नागपूर मार्गावरील जगन्नाथ धाम शंकुतला फार्म्स येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा धर्म संमेलन सोहळा होणार आहे. यावेळी भाविकांना शंकराचार्य यांच्या दर्शन घेण्याची संधी आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. साडे आठशे वर्षांपूर्वीची शिवलिग, नारायण पादुकांचे दर्शनही भक्तांना घेता येणार आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसाद आणि रुद्रांक्ष प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी १९ ऑक्टोबर रोजी शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांशी ते संवाद साधणार असून, स्थानिक प्रसार माध्यम प्रतिनिधींशीही ते वार्तालाप करणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला दामोधर मंत्री, रोडमल गहलोत, शैलेश बागला, अजय जयस्वाल उपस्थित होते.
