News34 chandrapur
चंद्रपूर - दिवाळी मध्ये वीजग्राहकांचा दिपोत्सव आनंदात साजरा होण्यासाठी महावितरणद्वारा सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत. Fire crackers
दिवाळीमध्ये वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडीत व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी वीज वाहिन्यांची व वीज उपकरणांची देखभाल व दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत यात, उपकेंद्रातील उपकरणांची तपासणी व दुरूस्ती करणे, नादुरूस्त असलेले किटकॅट बदलविणे, रहदारीच्या ठिकाणी लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांचे गार्डिंग व्यवस्थीत करून घेणे, योग्य क्षमतेची वितळ तार (Fuse Wire) टाकणे, विभागीय/मंडळ/क्षेत्रीय स्तरावर नियंत्रण कक्ष तिन्ही पाळयात (२४x७) सुरू ठेवणे आदी बाबींचा समावेश आहे. Diwali 2022

दिवाळीमध्ये मोठया प्रमाणात वीज वापर रोषणाई इत्यादी साठी होतो. तेव्हा विजेचा वापर अत्यंत सुरक्षीतपणे होणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे वीज अपघात होणार नाही यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांनी दक्ष रहावे व योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, दिवाळीच्या काळात पुरवठा अखंडीत राहील यासाठी विभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी, शाखा अधिकारी यांना दिवाळी पुर्ण होईपर्यंत स्वत: जातीने उपस्थीत राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. Msedcl
या काळात विद्युत यंत्रणेत बिघाड होऊन निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्वग्राहकांनी तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दिवाळींच्या शुभेच्छांसह मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आले. चंद्रपूर मंडलातील ग्राहकांनी ७८७५७६११९५ व गडचिरोली मंडलातील ग्राहकांनी ७८७५००९३३८ यावर संपर्क साधावा.