News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील वडगाव प्रभागात अस्वलीचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. Wildlife
वडगाव प्रभागातील आंबेडकर सभागृह, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन व साईनगर भागात अस्वल फिरत असून नागरिकांना रात्रीच्या सुमारास अस्वल नजरेस पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Wild animal
अस्वलीचा तात्काळ वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे. Bear in city
सध्या प्रभागात नागरिकांचे रात्रीला फिरणे बंद झाले असून कधी अप्रिय घटना घडू शकते, करीता तात्काळ चंद्रपूर वनविभागाने अस्वलीचा बंदोबस्त करावा.
