News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात पार पडला, 15 व 16 ऑक्टोम्बरला लाखो नागरिकांनी धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमात उपस्थिती लावली.
लाखो नागरिक, प्रशासनाची होणारी दमछाक बघता अनेक स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत विविध उपक्रम आपल्या हाती घेत, कार्यक्रमात आपला हातभार लावला.
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायीना काही त्रास होऊ नये याची राजकीय पक्षासाहित सामाजिक संस्थेने काळजी घेतली.
अश्यातच चंद्रपूर जिल्हा शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) 2 दिवसीय भोजनदान कार्यक्रम आयोजित केला होता, विशेष म्हणजे शिवसेनेची एक चमू भोजनदान कार्यक्रमात होती तर दुसरी चमू स्वच्छता अभियान राबवित होती.
जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शिवसैनिक व पदाधिकारी यांना स्वच्छतादूत म्हणून नेमले, कार्यकर्त्याना आदेश न देता स्वतः गिर्हे हातात झाडू घेत परिसरात सफाई करू लागले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पावनस्पर्शाने पवित्र झालेल्या चंद्रपुरात 15 व 16 ऑक्टोम्बरला मोठ्या उत्साहात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो, कोरोना निर्बंध उठल्यावर 2 वर्षांनी या कार्यक्रमाला लाखो नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
या दोन्ही दिवसात प्रशासनाला सहकार्य करीत शिवसेनेने स्वच्छता अभियान राबविले, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 ऑक्टोम्बरला स्वच्छतादूतांनी परिसर स्वच्छ केला.
या मोहीमेत शिवसेना जिल्हा समन्वयक शालीक फाले, युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, गणेश सिंग ठाकूर, बाळू भगत, विकास विरुटकर, आतीष चीमुरकर, एकनाथ देवतळे, वैभव काळे, चेतन कमाडी, सुष्मित गौरकार, ज्ञानेश्वर लोनगाडगे, शाहबाझ शेख, शिवा वझरकर,गणेश गाठे, आकाश गायकवाड, प्रदीप यादव, सुचित पिंपळशेंडे यांनी स्वच्छ्तादुत होउन कामगिरी बजावली.