News34 chandrapur
शेगाव - वनक्षेत्रात गस्त करून परत येत असताना 34 वर्षीय वनरक्षक सुरेश केंद्रे यांचा रविवारी रात्री 11.30 वाजता अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला. Forest guard death road accident
सुरेश केंद्रे हे खडसंगी बफर वनपरिक्षेत्रातील बोथली वहाणगाव येथे कार्यरत होते.
वनरक्षक सुरेश केंद्रे हे बोथली(वहानगाव) बिटात सायंकाळच्या सुमासरस वनक्षेत्रात गस्त करण्यासाठी गेले होते. दरम्यान कर्तव्यावरून घरी खडसंगी कडे परत येत असताना वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गावरील वहानगाव येथील शेतशिवाराच्या परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
Chandrapur forest
त्यावेळी त्या मार्गानी प्रवास करणाऱ्या वाटसरूना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनेची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांना दिली.ते लगेच आपल्या चमुसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी संबधित प्रकारची माहिती पोलीस विभागाला दिली.
पोलीस विभागाने सदर घटनेचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले.शवाची उत्तरीय तपासणी करून त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे.घटनेचा अधिक तपास शेगाव(बु.)पोलीस स्थानकाचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चमू करीत आहे.