News 34 chandrapur
वरोरा - राज्यात किंवा देशात एखादा सायबर गुन्हा घडला की पोलिसांपुढे एक आव्हान उभं राहतं, अनेकदा अश्या गुन्ह्यात सहजासहजी आरोपी मिळत नाही. Cyber crimeही एक मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेली संघटित गुन्हेगारी आहे, सायबर गुन्ह्याबाबत वेळोवेळी चंद्रपूर सायबर पोलिसांतर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं जातं तरीसुद्धा नागरिक सायबर गुन्ह्याच्या जाळ्यात अडकत आहे. Chandrapur police success
विशेष म्हणजे या गुन्ह्यात शिक्षित नागरिक अनेकदा बळी पडले आहे.
मात्र सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक करणे हे मोठं यश असत, असंच यश वरोरा पोलिसांना मिळालं आहे. Spam link
वरोरा येथे व्होल्टाज कंपनीत कार्यरत 49 वर्षीय नितीन काशिनाथ नक्षीने यांनी वरोरा पोलीस स्टेशन गाठत एक तक्रार नोंदविली.
फिर्यादी नक्षीने यांच्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडिया चे Creadit card आहे, त्या कार्ड चे बिल दरमहिन्याला 16 तारखेला येत असते, एप्रिल महिन्यात क्रेडिट कार्ड च्या बिलात 31 हजार रुपयांचे वाढीव बिल आले असता बिलात मोठी तफावत असल्याने नक्षणे यांनी SBI customer care मध्ये फोन लावत विचारणा केली. Credit card blocks
त्यांनतर 12 मे ला सायंकाळी नक्षीने यांना नवीन नंबरवरून फोन आला, तुमचं क्रेडिट कार्ड 4 दिवसांनी बंद होणार आहे, असे सांगत फिर्यादी यांच्या मोबाईल वर userprofile.online/sbicard अशी लिंक पाठवली.
सदर लिंक वर फिर्यादी यांनी क्लिक केलं असता त्यांना त्यामध्ये संपूर्ण माहिती भरायला पुढच्या व्यक्तीने सांगितले. State bank of india credit card
फिर्यादी यांनी त्या लिंक वर संपूर्ण माहिती भरली त्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या नंबरवरून फोन आला, फिर्यादीला 4 वेळा एक नंबर त्या लिंक मध्ये टाकण्यास सांगितले, जशी माहिती मिळत होती फिर्यादी तसे करत होते.
काही वेळात फिर्यादी यांच्या नंबरवर OTP आला, तो ओटीपी नक्षीने यांनी पुढच्या व्यक्तीला दिला त्यानंतर लगेच फिर्यादी यांच्या क्रेडिट कार्ड वरून तब्बल 1 लाच 27 हजार 500 रुपयांचे transaction झाले.
फिर्यादी यांची फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी याबाबत वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली.
घडलेला गुन्हा हा तांत्रिक पद्धतीचा असल्याने यामध्ये सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली. फिर्यादी यांच्या क्रमांकावर आलेला फोन व transaction ची माहिती घेतली असता सदर पैसे Razorpay या खाजगी कंपनीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.
गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यात राहणारे जतीनभाई प्रद्युमनभाई राजगुरू यांच्या खात्यात सदर पैसे वळते करण्यात आले अशी माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. Cyber cell
सदर तपासाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना देण्यात आली, त्यांनी लगेच पथक तयार करीत आरोपीच्या शोध घेण्याकरिता गुजरातला पाठविले, आरोपी जतीनभाई याला पोलिसांनी अटक केली, सदर आरोपीवर भोपाळ राज्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.
सदर गुन्हा यशस्वीपणे उघडकीस आणण्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खोब्रागडे, पोउपनी सर्व्हेश बेलसरे, पोउपनी सचिन मुसळे, प्रवीण निकोडे, निराशा अलोने यांनी केली.
चंद्रपूर जिल्हा पोलीस नागरिकांना अश्या फसवणूक करणाऱ्या लिंक, कॉल पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Varora - When a cyber crime occurs in the state or country, there is a challenge before the police, often the accused are not easily found in such crimes.
It is an organized crime that is functioning on a large scale, even though Chandrapur Cyber Police is doing awareness work among the citizens from time to time about cyber crime, citizens are getting caught in the web of cyber crime.
Interestingly, educated citizens have often become victims of this crime.
But Varora police has achieved such success that it would have been a big success to expose the said crime and arrest the accused.
49-year-old Nitin Kashinath Nakshine, working at Voltage Company in Varora, reached the Varora Police Station and registered a complaint.
Plaintiff Nakshine has a Creadit card of State Bank of India, the bill of that card comes on the 16th of every month, in the month of April, when there was an increase in the credit card bill of 31 thousand rupees, there was a big difference in the bill.
After that on 12th May in the evening, Nakshina received a call from a new number, saying that your credit card will be closed after 4 days, and sent a link to the complainant's mobile phone, userprofile.online/sbicard.
When the plaintiff clicked on the said link, the next person asked him to fill the complete information in it.
Plaintiff filled the complete information on that link after which he got a call again from another number, plaintiff was asked to enter a number in that link 4 times, as information was being received plaintiff was doing so.
After some time the OTP was received on the plaintiff's number, Nakshina gave that OTP to the next person, after which a transaction of Rs. 1 lakh 27 thousand 500 was made from the plaintiff's credit card.
As soon as the plaintiff came to know that he had been cheated, he lodged a complaint in this regard at the Varora Police Station.
As the crime committed was of technical nature, the help of cyber police was taken in this. When the phone number of the plaintiff and the information about the transaction was taken, the said money was transferred through Razorpay, a private company.
The Varora police received information that the said money was transferred to the account of Jatinbhai Pradyumanbhai Rajguru, who lives in Bhavnagar district of Gujarat state.
The information of the said investigation was given to the District Superintendent of Police Arvind Salve, who immediately formed a team and sent it to Gujarat to search for the accused, the accused Jatinbhai was arrested by the police, it was learned that a case has been registered against the said accused in Bhopal state.
Police Inspector Khobragade, Poupani Sarvesh Belsare, Poupani Sachin Musale, Praveen Nicode, Gishpa Alone under the guidance of District Police Superintendent Arvind Salve, Sub Divisional Police Officer Ayush Nopani took action to successfully uncover the said crime.
Chandrapur District Police has appealed to the citizens to beware of such fraudulent links, calls.