News34 chandrapur (रमेश निषाद)
बल्लारपूर - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बामणी दु.पं.स.बल्लारपूर जि.चंद्रपूर येथील सहाय्यक शिक्षिका सौ.प्रिती विलास जगताप यांना यावर्षीचा जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षण विभागा तर्फे देण्यात येणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद चंद्रपूर च्या मा.सा.कन्नमवार सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार किशोर जोरगेवार तर अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी वर्षा गौरकार होत्या सर्वच विभागाचे विभाग प्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते. शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे, डायट चे प्राचार्य धनंजय चाफले, जेष्ठ साहित्यिक ना.गो.थुटे सरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा शिक्षक दिनी 5 सप्टेंबर ला संपन्न झाला. Teacher day
सौ.जगताप यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि साहित्यिक सेवेबद्दल त्यांना प्रशासनाकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या या सन्माना साठी सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे व मित्र मैत्रिणींकडून अभिनंदन होत आहे.