News34 chandrapur
बल्लारपूर :- शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसविण्याचे आव्हान असतानाच बल्लारपूर पोलीस ठाण्यात चक्क ठाणेदारांनी एका राजकीय नेत्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा केल्याने सर्वत्र तर्कवितर्क जोडले जात आहे. वाढदिवस साजरा केल्याचा व्हीडिओ दोन दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने या व्हिडिओची चांगलीच चर्चा समाजमाध्यमावर सुरू आहे, viral video भाजपच्या नेत्यांचे वाढदिवस आता थेट पोलीस स्टेशनमध्ये साजरे केले जात आहे. पोलीस स्टेशनमधील बर्थ डे सेलिब्रेशन फारच चर्चेत आले आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ जिल्ह्यात तुफान वायरल झाला आहे. Bjp leader birthday celebrated in police inspector cabin
राज्यात शिंदे-फडणविसांची सरकार आहे. भाजपाचे देवेंद्र फडणविस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशन आता भाजपाची खाजगी मालमत्ता झालीय का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे बल्हारपूर हे मंत्री सूधिर मुनगंटीवार यांचे विधानसभा क्षेत्र आहे.
Birthday celebration in police station
एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला तर नवल नाही. पक्षाचा नेता म्हणून अनेक पदाधिकारी वाढदिवस साजरा करीत असतात. परंतु, बल्लारपूर पोलीस ठाण्यात तेही ठाणेदारांच्या कक्षात ठाणेदाराच्याच टेबलवर भारतीय जनता पक्षाच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाचा केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आला. हा व्हीडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर ठाणेदारांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. बल्लारपूर शहरात अनेक अवैध व्यवसाय सुरू आहे. गांजा, ब्राउनशुगर, कोळसातस्करी यासह इतरही अवैध व्यवसायावर आळा घालण्याचे ठाणेदार उमेश पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे, अवैध व्यावसायिकांना स्थानिक पोलीस विभागाकडून एकप्रकारे मूकसंमती दिल्याचे बोलले जात आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याचा नुकताच बल्लापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश पाटील यांनी स्वतःच्या कॅबिनमध्ये मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
नुकतेच बल्लारपूर शहरातील भाजप सचिवाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून नागरिकांनी त्याला चांगलेच बदडले होते, मात्र आता भाजप पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस पोलीस स्टेशनमध्ये साजरा केल्याने भाजप पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.
Ballarpur :- At the same time as the challenge of curbing the increasing crime in the city, in Ballarpur police station, the Thanedars celebrated the birthday of a political leader with great enthusiasm. Since the video of birthday celebration has gone viral on social media for two days, this video is being discussed a lot on social media. Birthday celebrations in police stations have become very popular. The video of this celebration has gone viral in the district.
There is a Shinde-Fadnavis government in the state. BJP's Devendra Fadnavis is the home minister of the state. Therefore, questions are being raised whether the police station has now become a private property of the BJP.
Interestingly, Ballarpur is the assembly constituency of minister Sudhir Mungantiwar.
It is not surprising if a political leader's birthday is celebrated by the office bearers of that party. Many office bearers are celebrating their birthdays as party leaders. However, in Ballarpur police station, in the thanedar's room, a birthday cake was celebrated by cutting the birthday cake of an ex-officer of Bharatiya Janata Party on the thanedar's table. After this video went viral on social media, many question marks are being raised on the role of Thanedars. Many illegal businesses are running in Ballarpur city. Thanedar Umesh Patil has a big challenge to curb other illegal businesses including ganja, brown sugar, coal mining. Interestingly, illegal traders are said to have been given a kind of tacit approval by the local police department. In this way, the former Bharatiya Janata Party office bearer recently celebrated the birthday of Ballapur Police Station Thanedar Umesh Patil in his own cabin with great gaiety. This birthday is well discussed in the political circles of the district.