News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपुरात वाजतगाजत सुरू झालेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेमुळे शहरात तब्बल 500 किलोमीटर च्या वर पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले.
मात्र त्या रस्त्याचं दुरुस्तीकरण निकृष्ट दर्जाचं झाल्यानं शहरातील संपूर्ण रस्ते खड्ड्यात गेले आहे. Chandrapur collector bungalow
शहरातील रस्त्याचं हाल असे आहे मात्र चंद्रपूरातील व्हीआयपी भागातील रस्त्याचं हाल काय हे कधी आपल्या नजरेस पडलं आहे काय? जिल्हाधिकारी बंगल्या समोर तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून कॉंक्रिटिकरण करण्यात आले, मात्र पावसात अवघ्या 2 महिन्यात तो रस्ता खचून गेला.
VIP Area
8 जानेवारी 2022 ला जिल्हाधिकारी बंगला, आयुक्त यांचं निवासस्थान असलेल्या भागात भूमिपूजन करण्यात आले, त्या रस्त्याचं काम अत्यंत संथगतीने सुरू होते, अनेक महिन्याने ते काम पूर्ण झाले मात्र मुसळधार पावसात तो रस्ता जमिनीत खचून गेल्याने व्हीआयपी भागात सुद्धा भ्रष्टाचार होत आहे याची प्रचिती आली.
1 कोटी रुपये खर्च करून बनलेला रस्ता अमृत योजनेचा बळी ठरला.
कंत्राटदाराने पुन्हा रस्ता खोदून काढला असून आता यावर शासनाचे अतिरिक्त पैसे खर्च होणार आहे, मात्र अश्या निकृष्ट काम करणाऱ्यांवर कुणी कारवाई करण्याची हिंमत दाखविणार काय? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
