News34 chandrapur
चंद्रपूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन चोरगाव येथील शेकडो महिलांनी शिवसेना महिला आघाडीत प्रवेश केला. Shivsena news
पुर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व प्रवक्ता प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने तालुक्यातील चोरगाव येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेकडो महिलांनी शिवसेना महिला आघाडीत प्रवेश केला. येथे प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. तसेच नवीन शाखा कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात पक्ष संघटन आणखी मजबूत करणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी वर्षा कोठेकर, सुलोचना कोकोडे, नंदाबाई गाऊत्रे, श्वेता तोडासे, पोर्णिमा चौधरी, चंद्रकला मोहुर्ले, अश्विनी कोटरंगे, सुनंदा बावणे, सारिका दाते, संगीता गेडाम, शुभांगी बाेरूले, माला गाऊत्रे, शोभा गेडाम, सुरेश निंदेकर, गंगुबाई दाते, सुलोचना चौधरी, जनाबाई ठाकरे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
