News34 chandrapur
चंद्रपूर - नविन चंद्रपूर येथे म्हाडाच्या वतीने ५३ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या भुमिगत गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याची तक्रार संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.
Corruption chandrapur
Corruption chandrapur
त्यांच्या तक्रारीवरुन मंत्री मुनगंटीवार व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलींदकुमार साळवी यांनी मुख्यमंत्र्याना याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे म्हाडाच्या गटार योजनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन खरे सत्य लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे.
नविन चंद्रपूर म्हाडा येथे मे. ईगल इन्फ्रा इंडिया लिमी. या कंपनीला ५३ कोटी २९ लाख २२ हजार रुपये किमतीचे नविन चंद्रपूर येथे मलनिस्सारण गटार वाहिनी व एसटीपी २४ एमएलडीचे बांधकाम करण्याचा ठेका देण्यात आला. सदर गटार योजनेचे काम निृकष्ठ दर्जाचे झाले असून सदर गैरप्रकारात कंत्राटदारासोबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने कंत्राटदारांची पाठराखण करण्यात येत आहे असा आरोप करीत याबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे राजेश बेले यांनी पुराव्यासह तक्रार म्हाडाच्या मुख्य अधिकारी सह जिल्हाधिकारी, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री यांच्या कडे केली होती. मात्र याकडे कुणीही लक्ष न दिल्याने बेले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले. तब्बल आठवडाभर उपोषण केल्यानंतर अखेर तत्कालीन पालकमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उच्च स्तरीय समितीने म्हाडाच्या गटार योजनेची चौकशी केली व याबाबत अहवाल जिल्हाधिकाऱ्याना सादर केला.
सदर चौकशी अहवालामध्ये संबंधीत कंत्राटदार कंपनीवर ताशेरे ओढण्यात आले असल्याचा आरोप राजेश बेले यांनी केला व अहवालानुसार कांक्रीट कामाचे एनडीटी चाचणी अहवालाप्रमाणे काही स्ट्रक्चरल मेंबरची स्ट्रेन्थ कमी दिसून येते ती शासकीय अभियांत्रीकी विद्यालया विएनआयटी या संस्थे मार्पâत तपासणी करुन या कामाच्या दर्जाबाबत खात्री करुन घेण्याची शिफारस सदर अहवालात केली होती. सदर कामातील २५९४ पैकी १८५० मॅनहोल क्रॅक व प्लास्टरला तडा गेला आहे. एसटीपीच्या सेंट्रीगमुळे आडव्या उभ्या जार्इंटवर चिसलींग करुन गिलावा केल्याचे दिसून आले. सदर अहवालानुसार संबंधीत कंत्राटदार कंपनीवर तसेच कंत्राटदारांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, नागपूर विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूरकडे निवेदनातून केली होती. सदर तक्रारीचे गांभीर्य बघता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे.तसेच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी यांनी याप्रकरणी म्हाडाचे मुख्य अधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. Chandrapur mhada

यामुळे नविन चंद्रपूर म्हाडातील गटार प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले असल्याने याची उच्च स्तरीय चौकशी व दोषींवर त्वरीत कारवाई होईल असे संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे राजेश बेले यांनी म्हटले आहे.