News34 chandrapur
चंद्रपूर - 24 तास सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना विसावा व त्यांच्यामधील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी पोलीस क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येते, परिक्षेत्रीय स्पर्धा नंतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोलीस कर्मचारी कामगिरी बजावतात. Police sports
यावर्षी नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2022 चा शुभारंभ चंद्रपुरात करण्यात आला.
चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाला यंदा नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा मान मिळाला आहे. 18 ते 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस क्रीडा स्पर्धा चंद्रपूर पोलीस मुख्यालय मैदान, जिल्हा क्रीडा संकुल व सैनिक स्कुल मध्ये होणार आहे. Chandrapur police
स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यासहित नागपूर ग्रामीण, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया येथील तब्बल 840 पोलीस स्पर्धकांचा सहभाग असणार आहे. पोलीस क्रीडा स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक खेळ होणार आहे. या क्रीडा सत्रात सांघिक स्पर्धा हॉकी, फुटबॉल, हॅन्डबाल, व्हॉलीबॉल, खो-खो, बास्केटबॉल, कबड्डी, अॅथलेटिक्स व वैयक्तिक क्रीडा 10 किमी क्रॉस कन्ट्री, 10 व 5 हजार मीटर धावणे, 1 हजार 500 मीटर, 800 मीटर, 400, 200, 100 धावणे, 400 मीटर हडल्स, 110, 100 मीटर हडल्स, 4/100 मीटर, 4/400 मीटर धावणे, तिहेरी उडी, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, जलतरण, वेटलिफ्टिंग, कुस्ती, ज्यूडो, बॉक्सिंग, वू- शो आणि तायक्वांडो या खेळांचा समावेश स्पर्धेत असणार आहे. सांघिक व वैयक्तिक खेळांमध्ये महिला व पुरुष खेळाडूंचा सहभाग असणार आहे. सदरची स्पर्धा विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र डॉ. छेरिंग दोरजे व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या देखरेखीखाली होत आहे. स्पर्धेचं यशस्वी आयोजन संपन्न होणेसाठी आयोजन समिती सह विविध समित्या तयार करण्यात आल्या आहे.

Chandrapur - Chandrapur District Police Department has got the honor of Nagpur Regional Police Sports Competition this year. From 18th to 23rd September Police Sports Competition will be held at Chandrapur Police Headquarters Ground, District Sports Complex and Sainik School. As many as 840 police contestants from Nagpur Rural, Wardha, Gadchiroli, Bhandara, Gondia will participate in the competition. Team and individual sports will be held in the police sports competition. In this sports season, team competition Hockey, Football, Handball, Volleyball, Kho-Kho, Basketball, Kabaddi, Athletics and individual sports 10 km cross country, 10 and 5 thousand meters running, 1 thousand 500 meters, 800 meters, 400, 200, 100 Running, 400 m huddles, 110, 100 m huddles, 4/100 m, 4/400 m sprint, Triple jump, High jump, Long jump, Shot put, Discus throw, Swimming, Weightlifting, Wrestling, Judo, Boxing, Wu- The sports of Sho and Taekwondo will be included in the competition. Female and male athletes will participate in team and individual sports. Special Inspector General of Police, Nagpur Region Dr. Under the guidance of Chering Dorje and District Superintendent of Police Arvind Salve, Deputy Superintendent of Police Radhika Phadke, Inspector of Police Yogesh Pardhi is taking place. Various committees including organizing committee have been formed for successful organization of the competition.