News34 chandrapur
चंद्रपूर :- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सुचनेनुसार दि 16 सप्टेंबर रोजी वेकोलि नागपूर मुख्यालयात आयोजित बैठकीत धोपटाळा प्रकल्पग्रस्तांच्या नौकरीचे मंजूरी आदेश, चिंचोली रिकास्ट चा डि नोटीफिकेशन प्रस्ताव, अनावश्यक न्यायालयीन प्रकरणी मेरीट नुसार निर्णय घेणे, अनफिट प्रकरणे, प्रभावित गावांचे पुनर्वसन, नागलोन प्रकल्पात सेक्शन 9 आदि विषयावर सकारात्मक चर्चा होवून यातील अनेक विषय मार्गी लावण्याची भूमिका प्रबंधनाने घेतली.
Wcl chandrapur
वेकोलि नागपूर मुख्यालयात हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या बैठकीस अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक (CMD) मनोजकुमार, कार्मिक निदेशक संजीवकुमार जी. एम., एल.आर. आय. आर. यांचेसह अॅड. प्रशांत घरोटे, मधुकर नरड, धनंजय पिंपळशेंडे व प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते.
Hansraj ahir
बैठकीमध्ये हंसराज अहीर यांनी अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत वेकोलि मुख्यालयाव्दारे वेळकाढु धोरण अवलंबिण्यात येत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न वेकोलि मुख्यालयाच्या माध्यमातून व्हावा अशी भुमिका मांडली. यावेळी वेकोलि बल्लारपूर अंतर्गत धोपटाळा प्रकल्पातील नोकरीविषयक मंजुरी आदेश काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्याचे वरिष्ठांनी मान्य केले. चिंचोली रिकास्ट डि नोटीफिकेशन रद्द करण्यासंदर्भात कोल इंडीयाला प्रस्ताव सादर केल्याचे तसेच अनावश्यक न्यायालयीन मामल्यात मेरीट नुसार कार्यवाही करण्याचे वेकोलि अधिकाऱ्यांनी मान्य केले.
Coal india
यापूर्वी पानी प्रकल्पात प्रलंबित मामल्यात आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय हंसराज अहीर यांच्या आग्रही भूमिकेमुळे मार्गी लागला होता. हे उल्लेखनीय! आय.एम.इ. व अॅपेक्स बोर्ड व्दारा अनफिट झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यासंदर्भात प्रस्ताव तसेच नागलोन प्रकल्पास सेक्शन 9 चे नोटीफिकेशन करिता प्रस्ताव कोल इंडीयाला सादर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठांनी दिली.
या बैठकीत वालवो ट्रेनिंग सेंटर दुर्गापूर येथे सुरु करण्यास अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली. ग्रॅन्डसन रोजगार प्रकरणात बोर्डाकडून मान्यता घेवुन ही प्रकरणे मंजूर केली जातील तसेच धोपटाळा प्रकल्प धारकांविरोधात सातबारा फेरफार संदर्भात (डब्लू. पी) कारवाई परत घेण्याच्या भुमिकेवर सकारात्मक निर्णय घेवु असे आश्वासन अहीर यांना दिले. पी.डी.पी.टी प्रशिक्षणार्थ्यांना पाथाखेडा व्यतिरिक्त स्थानिक स्तरावर प्रशिक्षण देण्याचे वरिष्ठांनी मान्य केले.
या बैठकीत पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अनावश्यक कोर्ट मामल्याबाबत संताप व्यक्त करीत. शेतकऱ्यांची पिळवणूक सहन करणार नाही अशी भुमिका घेतली. प्रकल्पबाधीत गावांच्या पुनर्वसन व मशागत करण्यास अडचण निर्माण झालेल्या उर्वरित जमिनीचे अधिग्रहण करण्याबाबत सुध्दा अहीर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

