News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल: - मुल तालुक्यातील मौजा आगडी येथील बफर जंगलात जनावरे चरायला नेलेल्या गूराख्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना रविवार (१८) रोजी दुपारी १.४५ दरम्यान घडली. Tiger attack
अरविंद आबाजी गेडाम (४२) असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गूराख्याचे नाव आहे. नेहमी प्रमाणे जनावरे जंगलात चरायला नेले असता जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने अरविंद गेडाम यांचेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. सदर घटना जानाळा बफरझोन कक्ष क्रमांक ३५५ मध्ये घडली. वाघाने गुराख्याला गंभीर जखमी केल्याचे माहित होताच तात्काळ वनविभाग बफरचे क्षेत्र सहायक थेरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तात्काळ दखल होऊन जखमीला उपचाराकरिता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. Wild animals
पुढील तपास वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक श्री. थेरे व वनरक्षक कर्मचारी करीत असून गुराखी जखमींना उपचारासाठी लागणारा खर्च वनविभाग करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
