News34 chandrapur
चंद्रपूर - Cricket म्हटलं की IPL चा विशेष उल्लेख होतो, सामन्यासाठी नव्हे तर तो क्रिकेट सट्टा साठी, आयपीएल दरम्यान हजारो कोटींचा सट्टा देशात लावल्या जातो, या जुगार खेळात अनेक मोठे मासे कार्यरत आहे. Online Bettingआधी हा जुगार फोन द्वारे व्हायचा मात्र आता हा सट्टा आधुनिक झाला असून सरळ ऑनलाइन द्वारे खेळल्या जात आहे.
अँड्रॉइड app द्वारे खेळणाऱ्यांना एक आयडी दिल्या जाते त्यामध्ये पैसे म्हणजेच Coin जमा करून सट्टा लावल्या जातो.
मध्यंतरी विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे क्रिकेट वर सट्टा लावणारे व खेळविणारे चंद्रपूर च्या आरोपींना अटक करण्यात आली होती, एक एक करता आरोपींची संख्या 50 च्या घरात गेली. Asia cup 2022
यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपींची संख्या जास्त होती.
जिल्ह्यात आयपीएल जुगार जोमात सुरू आहे. गडचिरोली पोलिसांनी ह्याचा पर्दाफाश केला. मात्र चंद्रपूर पोलिसांनी ह्याविरोधात अद्याप कुठली कारवाई केली नाही. अशा आशयाची बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित केली. बातमी प्रकाशित होण्याच्या दुसऱ्याच दिवशी चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने यावर कारवाई करीत चार आरोपीला पकडले. मात्र आयपीएल जुगारात बरेच मोठे मासे सक्रिय आहेत. अशा मोठ्या माशांवर पोलीस प्रशासन कारवाई करेल काय ह्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.
Cricket gambling
चंद्रपूर आणि इतर लगतच्या जिल्ह्यात क्रिकेटवर सट्टा खेळवण्याचे एक मोठे रॅकेट सक्रिय आहे. हे जाळे चंद्रपूरसह गडचिरोली, यवतमाळ, वर्धा येथे पसरले असून याची मुख्य सूत्रे ही नागपुरातुन हलविण्यात येतात. betx. co, nice.777.net अशाप्रकारची अनेक बेकायदेशीर वेबसाईट तयार करण्यात येतात ज्याला कुठलीही मान्यता नाही. अशा बेकायदेशिर ऑनलाईन सट्टा प्लॅटफार्मचे युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातुन एजंट / क्लायंट तयार केले जातात. आणि ह्या माध्यमातून दररोज कोटींचा जुगार खेळल्या जातो.
चंद्रपूर जिल्ह्यात आयपीएल सट्टाबाजाराचे रॅकेट गडचिरोली पोलिसांनी समोर आणले. गडचिरोलीतील काही आरोपींना पकडण्यात आले आणि हे बिंग फुटले. Ipl gambling
यात बऱ्याच मोठ्या माशांवर कारवाई करीत त्यांच्या मुसक्या गडचिरोली पोलिसांनी आवळल्या. यातील काहींना अटक करण्यात आली तर काही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवला. ऑगस्ट महिन्यात गडचिरोली पोलिसांनीचंद्रपूर येथील राकेश कोंडावार, रजीक अब्दुल खान, महेश अल्लेवार ह्यांना अटक केली.
इम्रान पठाण (आलापल्ली), राकेश जेल्लेवार (आलापल्ली), रामू अग्रवाल (नागपूर), अंकित हुमने (नागपूर), मनीष तलवानी (नागपूर), वाजीद भाई (तेलंगणा), महेश (सिरोंचा), गणेश (सिरोंचा), संदीप (सिरोंचा), अविनाश (चंद्रपूर), सुधाकर श्रीरामे (चंद्रपूर), महेश सुगत (चंद्रपूर), विशाल पंजाबी (चंद्रपूर), प्रदीप गोगुलवार (चंद्रपूर), राकेश वाघमारे (चंद्रपूर), विजय आहुजा (चंद्रपूर), संपत (चंद्रपूर) ह्यांची धरपकड करण्यात आली. असे असताना चंद्रपूर पोलिसांनी मात्र ह्या पार्श्वभूमीवर कुठलीच कारवाई केली नाही.
मध्यंतरी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आयपीएल सट्टा चालणाऱ्या ठिकाणी कारवाई करीत चौघांना जणांना अटक करण्यात आली. वरोरा तालुक्यातील शेगाव येथे ही धडक कारवाई करण्यात आली ज्यात नविष देवराव नरड (शेगाव), सुरज शंकर बावणे (शेगाव), नितीन तात्याजी उईके (गुंजाळा) आणि हरिदास कृष्णा रामटेके (खानगाव-चिमूर) ह्यांचा समावेश आहे. टीव्ही, मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि नगदी रक्कम असा 74 हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
क्रिकेट सट्टा चालविणाऱ्यांची ही आहेत बडी नावे
ह्याच क्षेत्रात सक्रिय असलेल्या काही विश्वसनीय सूत्रांनुसार चंद्रपुर शहरात आशिष, आसिफ, राजीक, नीरज, धीरज, अविनाश ह्यांच्या नावांची चलती आहे तर भद्रावती मध्ये अरविंद आणि राजुरा मध्ये भगत ह्या व्यक्तींची नावे ह्यात समोर येत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी यातील काही लोकांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. असे असताना देखील ही लोक चंद्रपुरात सट्टा सुरू कसा काय ठेवत आहे ही बाब स्थानिक पोलीस प्रशासनाबाबब प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. एवढेच नव्हे तर शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथुन देखील चंद्रपुरात अनेक सूत्रे हलवली जातात.
सध्या Ipl नंतर आता चंद्रपुरातील हेच सटोरी सुरू असलेल्या Asia Cup मध्ये सट्टा लावण्यात व्यस्त आहे.
India vs pakistan यांच्या क्रिकेट सामन्यात कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला, आता asia cup चा शेवट srilanka vs pakistan यांच्या फायनल मॅच ने होत आहे.
एकदा पोलिसांच्या जाळ्यात हे सट्टा अडकले तर पुन्हा हे तेच काम करणार आजही मोठया प्रमाणात या जुगारात राजकीय सह अनेकांची मोठी नावे गुंतलेली आहे.
विशेष म्हणजे हा सट्टा थांबवा अशी मागणी करणारे हेच राजकीय पदाधिकारी या धंद्यात गुंतले आहे.