News 34 chandrapur
चंद्रपूर - स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंद्रपूर या मनपाच्या मोहिमेत शहरातील अनेक रस्त्यावर सफाई करण्यात आली होती.
सफाई तर झाली मात्र अनेक रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य वाढलं.
चंद्रपूर शहरातील असाच एक विशालकाय खड्डेयुक्त ऐतिहासिक रस्ता मागील अनेक वर्षांपासून खड्ड्यात गेला आहे. Potholes in the road
बागला चौक ते राजीव गांधी कॉलेज समोरून लालपेठ जाणाऱ्या या मार्गावर हजारो खड्ड्यांचा विकास झाला आहे.
इतकेच नव्हे तर या मार्गाने 1 फूट पासून ते 10 फूट पर्यंत खड्ड्यांचं संगोपन उत्तमरीत्या केले.
हे सर्व खड्डे नागरिकांना त्रासदायक बनले असतील तरी नेत्यांना काही दिसले नाही.
या मार्गावरून आमदार, खासदार व मंत्र्यांची अनेकदा वारी होते पण त्यांना त्या खड्ड्यांचा त्रास मुळीच जाणवीत नाही.
चंद्रपूर मनपाचा कार्यकाळ संपण्याआधी अंचलेश्वर गेट ते बागला चौक तयार झाला मात्र बागला चौक ते लालपेठ हा रस्ता तसाच विकासाची वाट बघत ताटकळत राहिला.
आज अनेक हजारो सामान्य नागरिक त्या मार्गावरून शहरात ये जा करतात, वाहनांची नादुरुस्ती, पाठीचा व मणक्यांच्या त्रास वाढत असला तरी नागरिक गपचूप तो त्रास सहन करीत आहे.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील रस्त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मध्यंतरी बागला चौक ते लालपेठ या रस्त्यासाठी 1 कोटी च्या वर निधी आमदार जोरगेवार यांनी मंजूर केला होता, त्यानंतर आमदारांच्या कार्यकर्त्यांनी अनेक बॅनर लावले, वेळ गेला बॅनर उतरले पण तो रस्ता तसाच खड्ड्यात राहिला.
जिल्ह्यातील मंत्री, आमदार व खासदारांचे विकासाबाबत व्हिजन मोठे असले तरी त्या छोट्या रस्त्यावर सर्व जनप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहे.
विशेष म्हणजे या मार्गावरून चैत्र पौर्णिमेला महाकाली मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात, महावितरण चे विभागीय कार्यालय याच मार्गावर आहे, पुढे गेल्यावर शहरातील प्रसिद्ध राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय सुद्धा आहे.
पण सदर रस्ता नेहमी साठी खड्डामुक्त करणारा अभियंता अजूनही चंद्रपुरात आला नाही ही मोठी शोकांतिका आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी नेहमी आपल्या भाषणात माता महाकालीचा उल्लेख करतात मात्र मंदिराकडे जाणारा संपूर्ण मार्ग खड्ड्यात गेला असा उल्लेख कुणी करीत नाही.
कधीतरी दुचाकी वाहनाने आमदार, खासदार व मंत्री महोदयांनी फेरफटका मारावा म्हणजेच त्यांना सामान्य जनतेचा त्रास कळणार.
सध्या रस्ता बनविणे सोडून त्यावर पॅच बसविण्याचे काम सुरू आहे, म्हणजेच फाटक्या कपड्यावर ठिगर बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
Chandrapur - Swachh Chandrapur Sundar Chandrapur was a campaign of the Municipal Corporation to clean many streets in the city.
The cleaning was done, but the empire of potholes increased on many roads.
One such huge potholed historic road in Chandrapur city has gone into potholes for the past several years.
Thousands of potholes have developed on this road from Bagla Chowk to Lalpeth in front of Rajiv Gandhi College.
Not only this, this method also takes care of pits from 1 feet to 10 feet.
All these potholes may have become a nuisance to the citizens, but the leaders did not see anything.
MLAs, MPs and ministers often pass through this road but they do not feel the trouble of those potholes at all.
Anchaleshwar Gate to Bagla Chowk was completed before the tenure of Chandrapur Municipal Corporation, but the road from Bagla Chowk to Lalpeth remained waiting for development.
Today, many thousands of ordinary citizens come to the city through that route, but the problems of the vehicles, back and spine problems are increasing, but the citizens are secretly suffering.
Chandrapur MLA Kishore Jorgewar has sanctioned Rs 20 crore for the road in the city, meanwhile MLA Jorgewar had sanctioned over Rs 1 crore for the road from Bagla Chowk to Lalpeth, after that MLA workers put up many banners, time passed the banners came down but the road remained in a pit. remained
Although the Minister, MLAs and MPs of the district have a big vision for development, all the people's representatives are ignoring that small road.
What is special is that thousands of devotees come from this road on Chaitra Purnima to have a darshan of Mahakali Mata, the divisional office of Mahavitaran is located on this road, and further there is the famous Rajiv Gandhi College of Engineering in the city.
But it is a big tragedy that the engineer who made the said road permanently free of potholes has not come to Chandrapur.
MLAs, MPs and Ministers should take a two-wheeled vehicle sometime, that means they will know the problems of the common people.