News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराची महती आणि गोंडकालीन शिल्पकलेचा प्रचार प्रसार करण्यासाठी नवरात्रो उत्सवादरम्याण भव्य माता महाकाली महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली असुन सदर महोत्सवाचे निमंत्रण दिले आहे. यावेळी माजी नगर सेवक बलराम डोडाणी, रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख अजय जयस्वाल, महाकाली भक्त कुक्कु साहाणी, अजय चिंतावार आदिंची उपस्थिती होती. Mahakali mandir

चंद्रपूरात प्रथमच भव्य महाकाली महोत्सव घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन तथा माता महाकाली भक्तगण यांच्या पूढाकाराने सदर महोत्सव नवरात्री उत्सवादरम्याण आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवाला महाकाली भक्तांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्याण सदर महोत्सवात उपस्थिती दर्शविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत नियोजित माता महाकाली महोत्सवबाबत माहिती दिली असुन त्यांना महोत्सवासाठी आमंत्रित केले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील श्री. माता महाकाली मंदिराच्या गोंड कालीन इतिहासाची त्यांना माहिती दिली. येथील प्राचीन वास्तुंबाबत त्यांना अवगत केले. गोंड कालीन उत्तम शिल्प आणि चंद्रपूरच्या माता महाकालीची महती दर्शवणारा हा महोत्सव असुन आपण या महोत्सवाला उपस्थित राहावे अशी विनंती यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माता महाकाली भक्तगणांच्या वतीने केली आहे. Mahakali festival chandrapur