News34 chandrapur
भद्रावती - बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी होण्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान येथील चांदा आयुध निर्माणीच्या वसाहतीत सेक्टर क्रमांक ४ मधील ४२ बी क्रमांकाच्या क्वार्टरमध्ये घडली.
Leopard attack
Leopard attack
प्राची पंढरी नन्नावरे (४) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. ती आपल्या क्वार्टरमध्ये सायंकाळी खेळत असताना बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यात तिच्या पायाला जखम झाली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर उपचार करुन तिला घरी पाठविण्यात आले. दरम्यान आयुध निर्माणी वसाहत ताडोबा-अंधारी प्रकल्पाला लागून असल्याने वाघ, बिबट, अस्वल असे हिंस्र प्राणी नेहमीच या वसाहतीत वावरत असतात. या घटनेने आयुध निर्माणी वसाहतीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.