News 34 chandrapur
वरोरा - येथील एका व्यक्तीने महिला फार्मसीस्टचा विनयभंग केल्या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे. शुभम गवई असे आरोपीचे नाव आहे.
वरोरा येथील विनायक ले आऊट मध्ये असलेल्या सोनवणे यांच्या मेडिकलमध्ये 5 सप्टेंबरला रात्री आरोपी हा औषधी घेण्याच्या बहाण्याने गेला. मेडिकलमध्ये असलेल्या महिला फार्मासिस्टला चेहऱ्यावर असलेले डाग दाखवत त्यासाठी जास्त पावरच्या गोळ्या दे अशी मागणी केली. डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय आम्ही गोळ्या देत नाही असे महिला फार्मासिस्टने सांगितले. तुझी facebook id आयडी आहे का? असेल तर सांग मी तुला रिक्वेस्ट पाठवितो, सर्व मुली माझ्या मैत्रिणी आहे, माझं घर समोरच आहे आपण तिथं भेटू असे म्हणत शुभम त्या महिलेची छेड काढू लागला. Molested
महिलेने विरोध केला असता मी राजकीय पक्षांचा उपाध्यक्ष आहे माझे कुणी काहीही बिघडवू शकत नाही अशी धमकी त्या महिलेला शुभम गवई ने दिली.
त्यानंतर महिला फार्मासिस्ट सोबत ओळख काढत अश्लील हातवारे करीत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 6 सप्टेंबरला दुपारी आरोपीवर कलम 354, 354(ड) नुसार वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान दुपारी 2.40 मिनिटांनी आरोपीला कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांनंतर आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली.
विशेष म्हणजे आरोपी हा भीम आर्मी चा जिल्हा उपाध्यक्ष पदावर होता, संघटनात्मक शिस्त भंग केल्याप्रकरणी 22 ऑगस्टला पक्षाने त्याची हकालपट्टी केली होती.