News 34 chandrapur
चंद्रपूर : भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. Indian army विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हानिहाय निवड प्रक्रिया नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.
Agniveer recruitment 2022
'अग्निवीर ' अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून 59 हजार 911 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली जाईल, असे कळविण्यात आले आहे.