News 34 chandrapur
चंद्रपूर - म्हणतात ना सध्या राजकारणात काहीही शक्य आहे, नेता ज्यांच्याविरोधात बोलतो पुढे तो त्या पक्षात एन्ट्री मारतो असंच सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. Shivsena uddhav thackeray
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड करीत आम्ही खरे शिवसैनिक व शिवसेना आमची अशी घोषणा केली. Shivsena eknath shinde
पक्षातून बंड केल्यावर एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले, मात्र आता राज्यात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेनेत वाद निर्माण होत आहे.
शिवसेना आमची, निवडणूक चिन्ह आमचं असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला मात्र सध्या हे प्रकरण निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टात गेलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मात देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करीत शिवसेनेला आव्हान दिलं आहे. Shivsena crisis
उद्धव ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख नितीन मत्ते हे जुगार प्रकरणात अडकल्यावर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, मात्र आता त्यांची सरळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. Political breaking
तसेच शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे विरोधात पहिलं आंदोलन करीत एकनाथ शिंदे यांची प्रतिमा जाळणारे माजी नगरसेवक बंडू हजारे यांची शिवसेना सह संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
शिंदे गटातील शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दोन्ही पदाधिकारी यांचे नियुक्तीपत्र जाहीर केले आहे.
दोघांच्या नियुक्तीने आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळेल.
शिंदे सेना चंद्रपुरातील उद्धव ठाकरे गटातील किती एकनिष्ठ सैनिकांना आपल्या गटात सामील करण्यास यशस्वी ठरेल ही तर येणारी वेळच सांगणार.