News34 chandrapur 
चंद्रपूर - मठाची भिंत पाडल्यावर तेथील मलब्याच्या वादात चंद्रपूर शहरात चांगलाच वाद निर्माण झाला.
त्या मठाचे ट्रस्टी म्हणून 66 वर्षीय किशोर कपूर व मुकुंद टंडन हे काम बघतात, 14 सप्टेंबर ला हेमंत आक्केवार, रोहित पुगलिया व राजेश काशीयावाले यांनी मठाची भिंत तोडून त्यामधील मलबा नेला होता. Breaking news
त्यावेळी त्यांना भिंत का तोडली? व मलबा का नेला याबाबत हटकले असता त्यांनी कपूर यांना तुमच्याने जे होते ते करून घ्या अशी धमकी दिली.
आज 15 सप्टेंबर ला पुन्हा हेमंत आक्केवार, राजेश काशियावाले, रोहित पुगलिया व बंजारीवाले यांनी मठात प्रवेश करीत मठाची भिंत तोडण्याचा प्रयत्न करू लागले असता कपूर यांनी तुम्ही मठाचे ट्रस्टी नाही असे गैरकायदेशीर कार्य करू नका असे म्हणत त्यांना हटकले मात्र कांग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया यांनी नागरिकांना भडकावीत उत्तेजित केले व आम्हाला शिवीगाळ करीत 10 ते 12 लोकांना आम्हाला मारहाण करण्यास प्रवृत्त केले. Crime news
यावेळी हेमंत आक्केवार, रोहित पुगलिया व राजेश काशीयावाले यांनी वयोवृध्द कपूर यांना हातांबुक्क्यांनी, तोंडावर, चपलाने मारहाण केली.
सदरचा प्रकार मुकुंद टंडन यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला मात्र राहुल पुगलिया यांनी टंडन यांचा मोबाईल हिसकावला.
कपूर हे शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास गेले असता राहुल पुगलिया यांनी हिसकावलेला मोबाईल परत केला पण त्यामधील रेकॉर्ड केलेले व्हिडीओ डिलीट करण्यात आले.
संत गुलाबदास महाराज मठ समोर 10 ते 12 लोकांना जमवून वयोवृद्ध नागरिकांना मारहाण करण्यात आली, व पुन्हा मठ जवळ दिसल्यास मारहाण करण्याची धमकी दिली, याबाबत कपूर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
कपूर यांच्या तक्रारीवरून हेमंत आक्केवार, रोहित पुगलिया, राहुल पुगलिया, राजेश काशियावाले, बंजारीवाले व इतर 10 ते 12 जणांविरुद्ध कलम 143, 147, 149, 323, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
