News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - कायद्याच्या दृष्टीने गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, आणि गावातील कुठलेही भांडण तंटा आपसी समझोत्याने निकाली काढण्याच्या दृष्टीने गावातील नागरिकांना, महिला यांना पोलिस स्थेशन पर्यंत आपला अमूल्य वेळ वाया जाऊ नये यादृष्टीने शासनाने गावात महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने आणि गावातीलच सुज्ञ नागरिक या समितीचा अध्यक्ष राहील असे सूचित केल्याने मुल तालुक्यातील मौजा कोसंबी येथे मागील दि.५/९/२२ रोज सोमवारला आदर्श ग्रामपंचायत कोसंबी येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदीं गावातीलच सर्वांना अपेक्षित असणारे सुज्ञ शांत व संयमी व्यक्त श्री. प्रभाकर बुधाजी चौधरी यांची अविरोध निवडून सभेमध्ये करण्यात आली. तसेच समिती मध्ये सदस्य म्हणून होतकरू सुशिक्षित कार्यशील युवा सरपंच श्री रविंद्र किसन कामडी सरपंच ग्रा.पं कोसंबी, उपसरपंच सारिका गेडाम, अर्चना मोहुलै, पोलीस पाटील, चंदाताई कामडी सदस्या ग्रा.पं.कोसंबी, रोशनी मोहुलै, ज्ञानेश्वरी चौधरी, निर्मला लेनगुरे, निशा सोनुले, विशु पेंदाम,लक्ष्मी रस्से,रूपा चौधरी,केशव निमसरकार, मनिष चौधरी, माधवराव सोनुले, दिवाकर कावळे, सुरज आकनपल्लीवार ग्रामसेवक, निखिल मोहुलै, आदर्श शेंडे,नैताम सर, प्रशांत गटलेवार मुख्याध्यापक कोसंबी, कडलवार सर यांचेसह राजेंद्र गिरडकर, सुभाष गुरनुले महाराज, देविदास गिरडकर, अंबादास गिरडकर, उमाजी पेंदाम,कालीदास गुरनुले, आणि गावातील सर्व प्रतिष्ठित सन्माननीय नागरिक सभेला उपस्थित होते. यानिमित्त कुठल्याही गावातील लहान सहान बाबीचे मतभेद व सोडवणूक गावातील सुज्ञ नागरिक व ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या, आणि पोलिस पाटील यांच्या सहकार्याने करुन गरीब असो वा श्रीमंत असो यांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील असे मत नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
