News34 chandrapur
चिमूर - एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून ठाकरे विरोधात बंड पुकारल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले.एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत भाजपशी हातमिळवणी करीत खुद्द मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. Shivsena news
शिवसेना ही आमचीच असा नारा एकनाथ शिंदे यांनी लावला असून अनेक नेते शिंदे गटात सामील होत आहे.
सध्या राज्यभरात शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत आहे, ठाकरे गटाने प्रत्येक पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेची शपथ देत त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र मागविले.
मात्र अश्यातचं चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख श्रीहरी सातपुते यांनी अचानक पक्षाचा राजीनामा देत वरिष्ठांना धक्का दिला आहे.
Political news
Political news
सातपुते शिंदे गटात जाणार की नाही? याबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण सांगितले, पक्ष संघटनेच्या कामात कुटुंब व व्यवसायात दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले, मात्र आपण शिवसैनिक म्हणून नेहमी राहू अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली. Thackeray shivsena

