News34 chandrapur
चंद्रपूर - दारूबंदी उठल्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध जुगार क्लब व सट्टा, कोंबडा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते. Crime update
मात्र अवैध धंदे व्यावसायिकांवर आशीर्वाद कुणाचा? खुलेआम हे सर्व धंदे सुरू होते.
झटपट पैसे कमविण्याच्या नादात युवकांना वाईट मार्गाचे वेड लागले, असाच खुलेआम जुगार चंद्रपुरातील दुर्गापूर येथे सुरू होता. Gambling
जाकीर नामक इसमाने दुर्गापुरात 2 दुकाने घेत झेंडी मुंडी, कटपत्ता व सट्टा सुरू केला होता.
कोयना गेट परिसरात कैलास दुर्गे ने ही सट्टा बाजार थाटला, मात्र कारवाई या अवैध धंद्यावर झाली नाही.
अखेर दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी जुगार धारकांच्या मुसक्या आवळल्या. Betting
27 सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर धाड मारीत 5 जणांना अटक केली.
यामध्ये आशिष चालुरकर, रमेश बोतकर, अशोक राऊत, राजेंद्र जुनारकर, अनिल ठाकरे या आरोपींचा समावेश आहे, पाचही आरोपीवर जुगार कायद्या अनव्ये गुन्हा दाखल करूण अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या धाडीत 1 लाख 85 हजार 700 रुपये रोख व 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.
विशेष म्हणजे जुगार क्लबचालक जाकीर व सट्टा क्लब चालक कैलास दुर्गे पोलीस अटकेच्या बाहेर आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जाकीर सोबत या धंद्यात राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांची पार्टनरशीप असल्याची बाब पुढे आली आहे.
पुढील तपास दुर्गापूर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
