News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात 28 सप्टेंबरला वडीलाचा मृत्यू व मुलीचा जगण्यासाठी संघर्षाची घटना उघडकीस आल्याने जनमानसात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोरपना तालुक्यातील विरुर गाडेगाव निवासी 27 वर्षीय पवन देवराव मेश्राम यांना रात्रीच्या सुमारास विषारी मण्यार सापाने चावा घेतला असता कुटुंबियांनी तात्काळ पवन ला गडचांदूर रुग्णालयात दाखल केले, प्राथमिक उपचार करीत पवन ला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी रेफर केले. Snake bite
पहाटे 5 वाजता पवन ला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता कर्तव्यावर असणारे डॉक्टर वेळेवर उपस्थित नव्हते.
पहाटे 5 वाजेपासून पवन ने सकाळी 7 वाजेपर्यंत मृत्यूशी झुंज दिली, वेळीच उपचार न मिळाल्याने पवन चा अवघ्या 27 व्या वर्षी मृत्यू झाला.
ज्यावेळी पवन ला चंद्रपुरात आणण्यात आले त्यावेळी त्याला तात्काळ उपचाराची गरज होती मात्र तसे काही झाले नाही. Doctor's carelessness
काही वेळात पवन ची 5 वर्षाची अनु ही ओकाऱ्या करू लागल्याने तिला सुद्धा सर्पदंश झाला असल्याचे निदर्शनास आले.
अनु ला चंद्रपूर शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तिथेही अनु ची हेळसांड करीत तात्काळ उपचार सुरू केला नाही. Hansraj ahir
सदर बाब चंद्रपूर भाजप अनुसूचित जमाती अध्यक्ष धनराज कोवे यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला मात्र अपेक्षित उत्तर त्यांना मिळाले नाही.
कोवे यांनी त्या हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, अन्यथा आम्ही रुग्णालयातून मृतदेह हलविणार नाही अशी भूमिका घेतली.
सदर बाब माजी खासदार हंसराज अहिर यांना कळली असता नियोजित कार्यक्रम टाळत त्यांनी रुग्णालयात धाव घेत, रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरले, अहिर उपस्थित असलेल्या डॉक्टर्सवर चांगलेच संतापले. Chandrapur medical college
हंसराज अहिर मुळे 5 वर्षीय अनु वर उपचार सुरू झाला.
मात्र 5 वर्षाच्या मुलींवरून वडिलांचे छत्र निव्वळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हरविल्याने अहिर यांनी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व सिव्हिल सर्जन यांना पुन्हा असे प्रकार घडू नये अशी ताकीद दिली.
सध्या धनराज कोवे यांनी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय पवन चा मृतदेह रुग्णालय परिसरातून हलविणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
