News34 chandrapur
चंद्रपूर - मुलं पळविणाऱ्या टोळीबद्दल राज्यात मोठ्या प्रमाणात अफवा पसरलेली आहे, पोलिसांतर्फे नागरिकांना वारंवार सूचना देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे, मात्र या अफवेच्या बाजारात संबंधित घटना घडली तर पोलिसांची मात्र दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही. Fake Child kidnapping
अशी घटना चंद्रपूर शहरात घडली आहे, मात्र त्या घटनेची पोलिसांना पूर्ण माहिती झाल्यावर त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली. चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रसिद्ध शाळेतील 11 वर्षाचा मुलगा, त्याला मोबाईल बघण्याचं अतोनात वेड होतं, आज तो मुलगा नेहमीप्रमाणे घरी मोबाईल वर गेम खेळत होता, शाळेला जायला उशीर होत असल्याने वडीलाने त्याला दटावत मुलाच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला. Chandrapur police
घडलेल्या प्रकाराचा त्याला राग आला व त्याच्या डोक्यात सुचली एक अनोखी युक्ती, तो शाळेला जाण्यासाठी निघाला, त्यानंतर सुरू झाला अपहरणाचा खेळ, ज्याप्रमाणे प्रत्येक चित्रपटात सस्पेन्स व थ्रिल असतं तसाच हा प्रकार होता, कारण या घटनेतील घडामोडीत अनेक थ्रिलिंग बाबी घडल्या.
त्या मुलाने आपल्या शर्टाची बटन तोडली व शाळेसमोर उभ्या असलेल्या काही लोकांच्या जवळ जात, त्याने डोक्यात असलेली कहाणी कथन केली.
काका, मला काही लोकांनी पेढा खायला दिला पण तो मी खाल्ला नाही, तर त्या व्यक्तीने माझ्या तोंडाला रुमाल लावत मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला.
अशी कहाणी त्या मुलाने उपस्थित सर्वांसमोर कथन केली, याबाबत शाळेला कळविण्यात आले, शाळेतून सरळ घरी सम्पर्क व त्यानंतर मुलाचे नातेवाईक व मुलगा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.
पोलिसांनी सर्व घटना ऐकली व सदर बाब गंभीर स्वरूपाची आणि विशेष करून राज्यात सुरू असलेली अफवा, चंद्रपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि जयप्रकाश निर्मल यांनी कर्मचाऱ्यांना निर्देश देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढायला सांगितले.
चंद्रपूर शहर पोलीस कामाला लागले, सर्व बाबी, परिसरातील एकूण एक कॅमेऱ्याची फुटेज तपासण्यात आली, मात्र असा एकही प्रकार आढळून आला नाही. Chandrapur crime news
मुलाने सांगितलेला प्रकार आणि प्रत्यक्ष केलेला तपास यामध्ये काही साम्य आढळून आले नाही, त्यानंतर पोलिसांना संशय आला.
काही वेळेनंतर पोलिसांनी त्या मुलाला विश्वासात घेतले व नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर जाणण्याचा प्रयत्न केला.
मुलाने दिलेली माहिती ऐकून पोलीस अवाक झाले होते, मला वडीलाने मोबाईल बघू दिला नाही, मला शाळेला आज जायचे नव्हते यासाठी हा बनाव मी केला असे त्या मुलाने पोलिसांसमोर कबूल केले.
घटनेची गंभीरता समजून पूर्ण शहर पोलिसांची यंत्रणा कामाला लागली आणि खोदा पहाड निकला चुहा असा प्रकार उघडकीस आला.
चंद्रपूर शहर पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सपोनि जयप्रकाश निर्मल यांनी नागरिकांना यावेळी महत्वपूर्ण आवाहन केले की, सध्या जग आधुनिक युगात वेगाने पुढे जात आहे, मात्र जगापुढे जाताना आपण आपल्या मुलांकडे दुर्लक्ष तर करीत नाही ना, हे आधी आपल्याला बघावं लागेल, कारण आज मोबाईल च्या युगात लहान मुलं हिंसक मोबाईल गेम, विविध शो बघत असतात, त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतो, हे पाल्यांनी वेळ काढून जाणून घ्यायला हवं. Police appeal
आज जो प्रकार घडला हे मोबाईल मधून पुढे आलेला प्रकार आहे, हे कुठंतरी थांबायला हवं.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना पडोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली होती.
