News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेल्या मुल नगरात प्रस्तावित मालधक्का होऊ घातल्याने मालधक्का मुळमध्ये होऊच नये म्हणून रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांना यापूर्वीच मर्निंग ग्रूप तर्फे व मुल वाशिय नागरिकां तर्फे लेखी निवेदन देण्यात आले. तेव्हापासून सुरु असलेल्या मालधक्याचे काम बंद ठेवण्यात आले होते.परंतु मागील पंधरा दिवसांपासून परत काम सुरु करण्यात आल्याने मुलची जनता संतापली असून अनेक संघटना युवक वर्ग एकत्र येऊन मालधका होऊच नये यासाठी आंदोलन केल्या जात आहे. व बिना परवानगीने वृक्ष केली जात असल्याने वृक्ष तोडीलाही विरोध होत आहे. शांत व संयमी मुल नगरातील नागरिकांचे तापमान दिवसागणिक वाढतच जात आहे. असे असतांनाही दक्षिण पूर्व रेल्वेचे अधिकारी प्रतापसिंग यांचे तर्फे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मार्फत मौजा विहिरगावं तुकुम भूमापन क्रमांक १७८/२,व २१६/२ या जागेची मोजणी करून घेत असल्याने संबंधित जागेला लागून असलेल्या जमीन धारकांना मोजणीची नोटीस देण्यात आलेली नाही. तसेच मागील तीन दिवसापासून सारखा पाऊस येत असल्याने मोजणी होऊ शकत नाही. करीता होत असलेली मोजणी त्वरित बंद करण्यात यावी असे लेखी पत्र भूमी अभिलेख कार्यालयाला माजी न.प.उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी दिले असून मोजणी करीत असतानाच आक्षेप घेतला आहे. निवेदनात राकेश रत्नावार,जीवन कोंतमवार, अभिजित चेपुरवार,भोजराज गोवर्धन, विवेक मुत्यलवार, लवनिष उधवानी,रणजित आकुलवार,अमन बारसागडे, प्रदीप वाळके इत्यादी मालधक्याला विरोध करणारे नागरिक उपस्थित होते.