News34 chandrapur
चंद्रपूर - केंद्र सरकार तर्फे पोषण माह म्हणून देशभर बालकांच्या आरोग्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे, याच अनुषंगाने महिला व बालविकास अंतर्गत येणाऱ्या चिंचाळा येथील चार अंगणवाडी मध्ये सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पहिल्या सहा महिने ते तीन वर्षे व दुसऱ्या गटात तीन वर्षे ते पाच वर्षाच्या एकूण दोनशे एकोणतीस बालकांमध्ये ही स्पर्धा अंगणवाडी सेविकांकडून घेण्यात आली होती.
यावेळी पहिल्या गटातील चार व दुसऱ्या गटातील चार अश्या जास्त वजनाच्या आठ बालकांना प्रोत्साहन पर बक्षीस नागाळा(सी) ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे यांच्याकडून देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, ग्रामपंचायत सदस्य माया धोटे, पंकज ठाकरे, सुप्रिया धोटे, शिष लाडके उपास्थित होते. healthy child
सदर स्पर्धेचे आयोजन चार आंगणवाडीच्या सेविका बेबीताई नांदे, छाया नरुले, अनिता देवाळकर, प्रतिभा वांढरे व मदतनीस वैशाली मेश्राम, वंदना कोहपरे, उमा पिंपळशेंडे, पूनम जंपलवार यांनी केले होते.
यावेळी पहिल्या गटात समर ठाकरे,रुद्रान्श लाखे, शिव भोयर, राघव अतकरी तर दुसऱ्या गटात धनश्री कोरडे, संस्कार सुरकर, आदित्य उईके याना बक्षीस देण्यात आले.
तसेच बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी मातांना मार्गदर्शन करून येत्या काळात अश्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मातांना करण्यात आले.

