News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - केंद्र व महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फतीने लाभाच्या विविध योजना शेतकऱ्यासाठी राबवित आहे. मात्र या सर्व योजनांची माहिती आनलाईन द्वारे फार्म भरन्याची सक्ती केली असून फार्म भरल्यानंतर लागणारे कागदपत्र ऑपलोड करावे लागते.
परंतु मागील एक महिन्यापासून शासनाने जाहीर केलेली kusum.mahaurja.cim/http/kusum.mahaurja solar/beneficiary /register/kusum yojana ही वेबसाईट सोलर इलेक्ट्रिक लावण्यासाठी दिली असून ही वेबसाईट मागील एक महिन्यापासून बंदच आहे. मुल मुल व सावली तालुक्यातील शेतकरी रोजच आणलाईन काम करण्याकडे जाऊन साईड चेक करून विचारपूस करुन प्रयत्न करीत आहेत.परंतु साईड बंद असल्याने काम धाम सोडून शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहे. संबंधित योजना कार्यालयाच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन केला असता तुम्ही प्रयत्न करीत रहा असा सल्ला कार्यालयातून शेतकऱ्याला देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे .त्यामुळे सावली मुल तालुक्यातील शेतकरी या योजने पासून अनभीज्ञ व वंचित राहावे लागत आहे. याला प्रशासनातील अधिकारी या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचवीत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या योजना पासून मुकावे लागत आहे. शेतात बोरव्हेल खोदुनही शेत पिकाला पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे देखील शेतकरी हताश झाला आहे.
सावली मुल दोन्ही तालुके मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकाचा उदरनिर्वाह हा शेतीवरच विसंबून आहे. दिवसेंदिवस शेती हि परवडत नसतानाही दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने शेतकऱ्याना शेती शिवाय दूसरा मार्ग नाही. शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांना कुठलाही रोजगार नाही. ही अवस्था शेतकऱ्यांची दिसून येत आहे. शासनाकडून शेतकऱ्यासाठी विविध योजना राबविण्यात येते. काही शेतकऱ्यांनी मागील दोन तीन वर्षापासून शेतात इलेक्ट्रिक पंप घेण्यासाठी MSEB कडे डिमांड पैसेही भरले असताना विजेचे कनेक्शन देण्यात आलेले नाही. अधिकाऱ्यांना भेटून विचारणा केली असता तुम्ही सोलर बसवा असे शेतकऱ्यांना सांगतात परंतु ना इलेक्ट्रिक ना सोलर त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला आहे.
Solar system
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. परंतु सर्व प्रक्रिया आनलाईन स्वरूपाची असल्यामुळे शासनाने दिलेली व सुरु केलेली वेबसाईट बंद असल्याने बिचारे शेतकरी काय करणार असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
Kusum solar scheme
एकीकडे दरवर्षी शेतीचा खर्च वाढत चालला असून शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता धान पिक व कापसाचे पिक जोमात असून त्यावर येणारे रोगराईचा हल्ला होत आहे. करीता यावर कृषी विभागाकडून नियंत्रण करणे गरजेचे झाले आहे. याबाबत शासन स्तरावरून त्वरित दखल घेऊन कृषी योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना तशा सूचना त्वरित निर्गमित करावे आणि कुसुम सोलर योजनेची व इतरही कृषी योजनेची वेबसाईट त्वरित सुरू करावी अशी मागणी अनेक शेतकरी बांधवांनी केली आहे.