News34 chandrapur
राजुरा : तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि ग्रामीण भागात मोर्चे बांधणी सुरू झाली.
राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे प्रभावित होऊन अनेक गावात राजकीय वातावरण तापू लागले अशातच ग्राम पंचायत सोनूर्ली अंतर्गत असलेल्या गट ग्राम पंचायत चीचबोडी येथील ग्राम पंचायतीचे व सुब्बई येथील दोन माजी सरपंच व इतर अनेक काँग्रेस व शिव सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करीत तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
Political update
(दि. ९) भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणूक संदर्भाने घेतलेल्या सभेत चीचबोडी येथील माजी सरपंच तथा काँग्रेसचे कार्यकर्ते आनंदराव आत्राम, बंडू टेकाम, खुशाब बोढेकर, शिवसेनेचे अमोल चोथले, सुब्बई येथील माजी सरपंच सुधाकर अंगलवार, यांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या पुढाकारात जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते व माजी आमदार संजय धोटे यांच्या उपस्थितीत पक्षाचे दुप्पटे गळ्यात टाकून भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
हा पक्ष प्रवेश चीचबोडी येथील भाजपाचे कार्यकर्ते शामसुंदर कारेकर, रामचंद्र कारेकर यांच्या प्रयत्नाने व सुब्बई येथील कार्यकर्ते शरद चाफले व नितेश कुरटकर यांच्या प्रयत्नाने करण्यात आला या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष सुनील सुनील उरकुडे, जिल्हा सचिव हरिदास झाडे, जिल्हा पदाधिकारी विनायक देशमुख, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष सुनंदा डोंगे, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी अरुण मस्की, माजी नगरसेवक राजू डोहे, महामंत्री दिलीप वांढरे, युवा मोर्चाचे सचिन शेंडे, किसान आघाडी व पूर्व विदर्भ संघटक प्रदीप बोबडे, नुकतेच पक्ष प्रवेश केलेले माजी नगर सेवक हरजित संधू, अजय उमरे, सतीश कोमवालीवार, दीपक झाडे यांची उपस्थिती होती.