News34 chandrapur
गडचांदूर - राज्यात प्रतिबंध असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी चंद्रपूर जिल्ह्यात सर्रासपणे सुरू आहे. Aromatic Tobacco Mafia
आज चंद्रपूर शहर असो की जिल्ह्यातील ग्रामीण भाग खुलेआम कॅन्सर देणाऱ्या सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री सुरू आहे. Tobacco smuggling
काही दिवसांपूर्वी ट्रॅव्हल्स द्वारे सुगंधित तंबाखू चयस तस्करीवर पोलिसांनी आळा घातला होता मात्र आता गडचांदूर येथील किराणा दुकानात तब्बल 7 लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू पकडल्याने तंबाखू तस्करांचे धाबे दणाणले आहे. Gutkha
20 सप्टेंबर ला गडचांदूर येथील केजीएन किराणा स्टोर्स मध्ये सुगंधित तंबाखू व स्वीट सुपारीचा 328 किलो एकूण किंमत 7 लाख 31 हजार 640 रुपयांचा साठा पकडण्यात आला.
Food & deih department
सदर प्रकरणात सदर पेढीचे विक्रेते सरफराज इलियास किडिया व पेढीचे मालक इस्तियाज इलियास किडीया यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन, गडचांदूर येथे भादवि कलम 188, 273 व 328 तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 च्या विविध कलमान्वये फिर्याद नोंदविण्यात आली. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रफुल टोपले व प्रवीण उमप यांनी घेतली