News34 chandrapur
चंद्रपूर - पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आले.
चंद्रपुरात नागरिकांकडून भव्य स्वागत स्वीकारल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 सप्टेंबरला ठाकरे यांच्या दौऱ्यात अनेक वादावादी झाल्या.
राज ठाकरे हे शहरातील खाजगी हॉटेलमध्ये थांबले होती. Mns raj thackeray
दुसऱ्या दिवशी परत जात असताना हॉटेलसमोर काही महिला आक्रमक झाल्या होत्या.
काही काळ त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले.
महिलांची मागणी होती की विदर्भात झालेल्या कलकाम कम्पनी घोटाळ्यातील आरोपींवर कडक कारवाई व कंपनीची बाजू व गुंतवणूकदार यांना धमकविणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी. Mns adhikrut
कलकाम कंपनी मधील गुंतवणूकदार ज्यावेळेस पैसे मागायला जात असे तेव्हा मनसेचे भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर त्यांना धमकवायचे असा आरोप गुंतवणूकदारांनी केला.
याबाबत भरत गुप्ता यांनी म्हटलं होतं की जर राज ठाकरे यांना भेटून त्यांचे पैसे परत मिळत असतील तर मी स्वतः साहेबांसोबत त्यांची भेट घडवून देणार, आम्हाला पण वाटते त्यांचे पैसे परत मिळावे.
मात्र ज्यावेळी गुंतवणूकदार महिला राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्या त्यावेळी भरत गुप्ता महिलांशी साधं बोलणे करायला ही आले नाही. Kal kaam news
अखेर राज ठाकरे हे त्या महिलांना भेटले, त्यांच्या समस्या निवांतपणे ऐकल्या व या संदर्भात तात्काळ ठाणे जिल्ह्यातील अविनाश जाधव यांना राज ठाकरे यांनी पाचारण करीत पुढच्या 15 दिवसपर्यंत ह्या प्रकरणाचा निकाल काढा अन्यथा मला पुन्हा या प्रकरणाचा तोडगा काढण्यासाठी चंद्रपुरात यावं लागेल असे राज ठाकरे यांनी ठणकावले.
ठाकरे यांचा आदेश प्राप्त होताच जाधव यांनी सुद्धा 15 दिवसाच्या आत हे प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन देत दोषींवर नक्की कारवाई करू असे गुंतवणूक दार महिलांना सांगितले. Investment fraud
कलकाम प्रकरणात मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहे.
ठाकरे यांचं आश्वासन मिळताच उपस्थित महिलांनी त्यांचे आभार मानले.
राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस नाट्यमय ठरला, जे पदाधिकारी त्यांच्यासोबत बैठकीत उपस्थित होते त्यांच्यावर अनेक महिलांनी गंभीर आरोप केले होते.